Ratnagiri : जिल्ह्यातील सर्व शाळेत आता ‘शुगर बोर्ड’ अनिवार्य

रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांमधील साखरेचे वाढते सेवन नियंत्रणात ठेवण्याबाबत जागृती करण्यासाठी शाळांमध्ये आता साखर फलक सावण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभाग व राज्य आरोग्य संचालनालय यांच्यामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये साखर फलक उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये साखरेच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम सांगणारे साखर फलक शाळेच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत.

गेल्या दशकात मुलांमध्ये टाईप टू मधुमेहाचे प्रमाण लक्ष्णीयरित्या वाढले आहे. जे पूर्वी प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळून येत होते. ही चिंताजनक वाद मुख्यतः साखरयुक्त, चरबीयुक्त पदार्थ, शीतपेये आदी सेवनाने यांच्या सहज उपलब्धतेने वाढत आहे. शाळांमध्ये अशा बस्तु सहज मिळत असल्याने मुले जास्त प्रमाणात गोड पदार्थ घेतात ते फता मधुमेह नव्हे तर दातांचे आरोग्य, स्थूलपणा व इतर संबंधीच्या विकारांचे कारण ठरते.

एका अभ्यासानुसार चार ते दहा वयोगटांतील मुलांचे रोजच्या आहारातील १३ टक्के आणि ११ ते १८ वयोगटांतील मुलांचे १५ टक्के असे सेवन साखरेचे असते. जे डब्ल्यू. एच. ओ. ने दिलेल्या पाच टक्के खूपच मर्यादेपेक्षा जास्त आहे.

यावर उपाय म्हणून शासनाने सर्व शाळांमध्ये साखर फलक लावण्याची शिफारस केली आहे. साखर फलक व घेतलेल्या कार्यक्रमाचा तपशील तीस दिवसाच्या आत राष्ट्रीय बाल हक संरक्षण आयोग कडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आरोग्याविषयक जागरुकता
‘साखर’ फलक बोर्ड ही योजना अनिवार्य स्वरूपात राबवण्याचे निर्देश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. शाळांनी कॅन्टीन, वर्ग खोल्या या ठिकाणा फलक ठळकपणे लावण्यात यावेत, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना साखरेच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक परिणामाची सतत जाणीव राहील. तसेच शाळांनाही ही माहिती त्यांच्या आरोग्य आणि पोषण कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करायला प्रोत्साहित करण्याबाबत तसेच साखर जागरूकता कार्यक्रम कार्यशाळा व इतर उपक्रम आरोग्य तज्ज्ञांच्या मदतीने नियमितपणे येण्याविषयी संदर्भीय पत्राद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:31 PM 12/Nov/2025