Ratnagiri : मानसिक संतुलन बिघडलेल्या विवाहितेची आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील विवाहितेने मानसिक संतुलन बिघडल्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.45 वा. सुमारास घडली. अनिशा अनिल गोरे (33, रा. वरचे वरवडे, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

अनिशाचे गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक संतूलन बिघडलेले असल्यामुळे ती ताणतणावाखाली होती. मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी ती आणि तिचा 10 वर्षांचा मुलगा घरात असे दोघच घरात असताना अनिशाने राहत्या घराच्या भालाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. दूपारी 1.45 वा. सुमारास तिचा पती अनिल दत्ताराम गोरे घरी आला असता त्याला पत्नी अनिशा हि गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने तातडीने याबाबत जयगड पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणी साठी रुग्णालयात पाठवला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 12/Nov/2025