चिपळूण : मौजे वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनारी सुरु असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी धाड टाकली. या धाडेत ९९,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मंगेश मधुकर दिवेकर (वय २८, रा. पेढे, चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो दारु गाळत असताना पोलिसांना सापडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 14/Nov/2025














