General Election 2025 | राजापुरात आज नगरसेवकपदासाठी तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी ३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार विकास गंबरे यांच्याकडे दाखल केले आहेत.

सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. यापुर्वी लोकनियुक्त नगराध्यरक्षपदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी एक अपक्ष उमेवारी अर्ज दाखल झाला होता. अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी प्रभाग क्र. २ ‘अ’ मधुन नगरसेवक पदासाठी अनिल नारायण कुडाळी यांनी शिवसेना (उबाठा) कडून तर प्रभाग क्र. २ ‘ब’ मधुन संगीता भिकाजी चव्हाण शिवसेना (उबाठा) कडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग क्र. ४ ‘ब’ मधुन आदित्य रमाकांत बाकाळकर यांनी नगरसेवकद पदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शनिवारी अखेर लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी यापुर्वी ज्योती सुनिल खटावकर यांनी हिंदु महासभेच्या वतीने तर प्रभाग क्रमांक ४ ‘ब’ मधून नगरसेवक पदासाठी राकेश सुनिल खटावकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवार १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारिख आहे. या आता केवळ दोनच दिवसांचा कालावधी उरला असून सोमवारी अंतिम दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांतील २० नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सोमवारी १० नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून १७नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. असून अर्जाची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर पर्यंत असून, निवडणूक चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:30 PM 15/Nov/2025