संगमेश्वर : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलावर सोमवारी संध्याकाळी ठेकेदार कंपनीचा काँक्रिट मिक्सर अचानक बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुलावर गर्डर बसवण्याच्या कामाला सुरुवात होण्याअगोदर मिक्सर बंद पडल्याने कामावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिक्सर पुलाच्या मध्यभागीच बंद पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढत असून प्रवासी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या घटनेने या कोंडीत आणखी भर पडली. या ठिकाणी पोलिस आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानंतर वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली; मात्र मिक्सर पुलावरच उभा असल्याने वाहनांना अरुंद जागेतून मार्ग काढावा लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 18/Nov/2025













