Ratnagiri : नाखरे येथे सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्यावर गुन्हा

पावस : तालुक्यातील नाखरे येथील रामेश्वरवाडी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मद्य पिणाऱ्यावर पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनार्दन शंकर नमसले (वय ५५) असे संशयिताचे नाव आहे.

ही घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी पूर्णगड सागरीसुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 19/Nov/2025