राजापुरातील देवस्थान इनाम जमिनींच्या अडचणींवर चर्चा

राजापूर : राजापूर शहरातील देवस्थान ईनाम जमिनींबाबत शासनस्तरावरून कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी याबाबतचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत राजापूर शहरातील देवस्थान ईनाम जमिनीबाबत व यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत राजापुरातील एड. शशिकांत सुतार व एड. यशवंत कावतकर यांनी भूमिका मांडली.

जिल्हयातील सर्वच देवस्थान ईनाम जमिनीबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी जिल्हयातील सर्वच देवस्थान इनाम जमिनींबाबत आढावा घेतला. याबाबत शासनस्तरावर अहवाल सादर केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जिंदल यांनी नमुद केले.

राजापूर शहरातील देवस्थान ईनाम जमिनीबाबत स्थानिक नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत यापुर्वीच राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी राजापूर तहसीलदा, प्रांताधिकारी व त्यानंर जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करून यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आ. सामंत यांनी याबाबत शासन स्तरावरही पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत आ. सामंत यांनी राजापूर शहरातील देवस्थान ईनाम जमिनीबाबत असणाऱ्या अडचणी, समस्या व जनतेची मागणी मांडण्यासाठी एड. शशिकांत सुतार व एड. यशवंत कावतकर यांना सांगितलेले आहे.

याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत देवस्थान ईनाम जमिनीबाबत असलेल्या तक्रारी, समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळि राजापुरातील देवस्थान ईनाम जमिनींबाबत स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी एड. शशिकांत सुतार व एड. यशवंत कावतकर यांनी मांडल्या. यामध्ये घर बांधणी, व्यवसाय करणे, बँकांकडून कर्ज घेणे, गहाण खत करणे, खरेदी विक्रीचे व्यवहार करणे या सर्व प्रक्रिया अडचणीच्या ठरत असल्याचे नमुद केले. यावर तोडगा काढून योग्य निर्णय व्हावा, जागा मालक, शेतकरी यांना न्याय मिळावा अशी भूमिका मांडली.

यावर जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांची बाजू ऐकून घेत याबाबत शासनाकडे अहवाल सादर केला जाईल असे सांगितले. तशी माहिती एड. शशिकांत सुतार व एड. यशवंत कावतकर यांनी दिली. या बैठीकाला महसुल अधिकारी तसेच शिवसेना राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले व अन्य उपस्थित होते. आ. किरण सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने राजापुरातील हा देवस्थान ईनामचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे एड. शशिकांत सुतार व एड. यशवंत कावतकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 21-Nov-2025