राजापूर : गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने झोडपून काढले. राजापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात तीन ठिकाणी वीज पडून सुमारे चार लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यात सातजणांना दुखापती झाल्या आहेत, सुदैवाने, जीवितहानी झालेली नाही. संगमेश्वर, गुहागर, चिपळूण या तालुक्यांतही वीज पडण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाचा जोर आजून दोन दिवस राहील. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे वीज धोका अजूनही कायम आहे. त्यासाठी सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत.
परतीच्या पावसाचा जिल्ह्याला ढगांच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसावेळी वीज कोसळण्याच्या घटना यंदा मोठ्या प्रमाणात आहे. आकस्मिक कोसळऱ्या या विजांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे तसेच वित्तहानीही होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नोकरीसाठी बाहेर पडलेले नागरिक घरी परतण्याच्या गडबडीत असतात त्याचवेळी विजांचे तांडव सुरू असते. नागरिकांनी दक्षता घ्या, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.
घरात असताना ही काळजी घ्या
ओल्या भिंती आणि धातूचे फर्निचर : पावसाच्या पाण्यामुळे घरामध्ये ओल असते. लोखंडी कपाट, खुर्ची, टेबल आदी वस्तू पा विद्युतवाहक असतात. त्यामुळे ओल असलेल्या भिंती आणि त्यांच्या संपर्कात टेकलेले वा धातूचे टेबल, खुर्ची, कपाटे, आदी वस्तु धोकादायक ठरू शकतात. या वस्तूंच्या विद्युतवाहक गुणधर्मामुळे घराबाहेर वीज पडली तरी क्षणात ती या वस्तूंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचू शकते.
विद्युत उपकारपणे : जमिनीवर पडणाऱ्या वीज जमिनीखाली असणाऱ्या विद्युतवाहक तारांपासून घरातील उपकरणांपर्यंत पोहोचून होणाऱ्या दुर्घटनांची संख्या थोडी आहे. त्यामुळे विजा चमकत असतना विद्युत उपकरणे बंद ठेवणे अधिक फायदे कनेक्शन टी. व्ही. पासून वेगळे करावे टेलिफोनच्या खांबावर व तारांवरही विजा कोसळतात, गच्चीवर त्याने आर्थिग स्वतंत्र ठेवावे.
कपडे सुकायला टाकण्याची तारांचा वापर टाळावा
कपडे वाळत घराच्या परिसरामध्ये अनेक वेळा या तारा बाधलेल्या असतात. विजा चमकू लागल्या की, महिला तारांवर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी धाव घेतात. असा तारांवर कोसळून दगावण्याची अधिक भीती असते. त्यामुळे कपडे वाळण्यासठी धातूंच्या तारांऐवजी दोरीचा वापर केल्यास अधिक सोयीचे ठरू शकते.
लायटनिग अरेस्टर उभारण्याची गरज
विजा कोसळल्यानंतर या मनोऱ्यांच्या माध्यमातून त्या खेचण्याचे काम केले जात असून, त्यासाठी मनोऱ्यांवर विशिष्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेच्या साह्य्याने मनोऱ्याच्या सुमारे २ कि. मी. च्या परिसरामध्ये पडणाऱ्या विजा खेचण्याची क्षमता आहे. त्यातच, खेचण्यात आलेली वीज जमिनीपर्यंत वाहुन नेण्याचीही त्याचवेळी यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. त्या यंत्रणेमार्फत खेचण्यात आलेल्या विजेची जमिनीपर्यंत सुरक्षितपणे वाहतूक केली जाते.
घराबाहेर असल्यास ही काळजी
वाहते पाणी
पाणी हे वीजवाहक असल्याने विजा चमकत असताना वाहत्या पाण्यात उभे राहू नये. पाण्यासाठी हातपंप किया पंपाचा वापर करू नये. विहिरीतही उतरणे शक्यतो टाळावे.
उंच झाड : पावसामुळे ओली झालेली झाडे ही विजा चमकत असताना अत्यंत धोकादायक असतात, वीज चमकताना झाडांखाली उभे राहू नये झाडावर वीज कोसळून झाड्याखाली थांबणारी व्यक्ती शॉक बसून शक्यता असते.
खुली मैदाने, शेती आणि समुद्रतट
विजा कमीत-कमी रोधकाचा आणि जमिनीच्याकडचा लहानात लहान मार्ग प्रवासासाठी निवडतात. त्यामुळे मैदान, शेत, टेकडया आदी उघड्या ठिकाणी विजा चमकत असताना उभे राहू नये
कानांची सुरक्षितता विजा पडतात तेव्हा मोठा आवाज होतो. त्यामुळे अशा वेळी कानामध्ये बोटे घालून कानाचे पडदे वाचवण्याचा प्रयत्न करावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 25/Oct/2024














