लांजा : येथील बाजारपेठेत रस्त्यामध्ये सापडलेले १० हजार रुपये असलेले एक पाकीट आढळताच गजानन रामजी शिंदे यांनी प्रामाणिकपणे लांजा पोलिस ठाण्यात आणून जमा केले. याबद्दल पोलिस ठाण्याच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
लांजा बाजारपेठेत एका अनोळखी व्यक्तीचे रस्त्यात पडलेले एक पाकीट गजानन रामजी शिंदे यांना सापडले. त्यांनी हे पाकीट लांजा पोलिस ठाण्यात आणून दिले. शिंदे यांनी सापडलेले पाकीट प्रामाणिकपणे परत केल्याने लांजा पोलिसांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. लांजा शहरातील अब्दुल अजीज रखांगी यांचे पाकीट असल्याची खात्री करून त्यांना ते परत करण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक आमोद सरंगले यांनी गजानन शिंदे यांचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 27/Nov/2025














