दापोली – खेड-दापोली महामार्गावर आज गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता एका कारचा अपघात झाला. नारगोली स्टॉपच्या जवळ कार अचानक नियंत्रणाबाहेर जात सरळ रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरदार धडकली. या अपघातात कार चालवणारी महिला किरकोळ जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच तिचे नातेवाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमी महिलेला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहन अचानक का नियंत्रणाबाहेर गेले याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. कार झाडाला धडकण्याइतकी अनियंत्रित झाल्याने काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 27/Nov/2025













