Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹१५००

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबर महिना सुरु झाला तरीही नोव्हेंबरचाच हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे आता दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आता यापुढचे हप्ते मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. तुम्हाला त्याआधी केवायसी करायची आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर जानेवारीपासून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायचे आहे.

केवायसी न केल्यास पैसे मिळणार नाही

लाडकी बहीण योजनेत केवायसी न केल्यास महिलांना पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, आता दरवर्षी केवायसी होणार आहे. केवायसीद्वारे लाडकी बहीण योजनेबाबत पारदर्शकता वाढणार आहे. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसीतून महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. यातून २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. दरम्यान, अजूनही लाखो महिलांचे केवायसी बाकी आहे. या महिलांनी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नये. त्यांनी लवकरात लवकर केवायसी करावे.

नोव्हेंबर – डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार?

लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु दोन वेगवेगळे हप्ते येणार असल्याचे बोलले जात आहे. एक हप्ता निवडणुकीआधी दिला जाईल, अशी चर्चा सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 05/Dec/2025