गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्य पिणाऱ्यांवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुधाकर सुर्वे (वय ४८) असे मद्यपान करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नीलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तालुक्यातील ओरी येथील एका हॉटेलसमोरील डांबरी रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या प्रौढांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश रामचंद्र माचिवले (वय ५५) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल सई शिवलकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 06/Dec/2025