Horoscope : आजचे राशीभविष्य 8 December 2025

Horoscope Today 8 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 डिसेंबर (December) 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त शंकराच्या मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करतात.

तसेच, उपवास धरतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळावं तसेच, भविष्य चांगलं जाण्यासाठी लोक भगवान शंकराकडे प्रार्थना करतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

मेष रास

मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. दिवसाची सुरुवात तुमची चांगली होईल. तसेच, तुमच्या विचारात स्थिरता राहील. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. तसेच, तुमच्या व्यवहारात आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल.

वृषभ रास

वृषभ राशीसाठी आजचा दिवस पराक्रमाचा असणार आहे. तुमच्या नोकरीत चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमचा व्यवहार सुरळीत चालेल. आजच्या दिवसात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमच्या निर्णयाने बॉस खुश होऊ शकतो.

मिथुन रास

मिथुन राशीसाठी आजचा दिवस बरकतीचा असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी मित्रांना भेटाल. त्यांच्याबरोबर छान वेळ घालवाल. तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.

कर्क रास

कर्क राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुमच्या मनासारखी एकही गोष्ट न झाल्यामुळे तुमचा क्रोध वाढेल. अशावेळी रागावर नियंत्रण ठेवा आणि निगेटीव्ह माणसांच्या संपर्कात राहू नका.

सिंह रास

सिंह राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल.

कन्या रास

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभमिळेल. घरात लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास
तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण करु शकता. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीसाठी दिवसाची सुरुवात चांगली असेल. दिवसाचा शेवट मात्र निराशाजनक असू शकतो. अशा वेळी आज कोणतीही मोठी रिस्क घेऊ नका. मात्र, तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल.

धनु रास

धनु राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमची मोठ्या संकटातून सुटका होऊ शकते. महादेवाच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिती चांगली भरभराट होईल. व्यवसायाचा विस्तार वाढेल.

मकर रास

मकर राशीच्या लोकांना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आज काही कारणास्त तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. अशा वेळी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं समाजत कौतुक होऊ शकतं.

कुंभ रास

कुंभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला शत्रूवर विजय मिळवता येणार नाही. तसेच, मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 08/Dec/2025