रत्नागिरी : कुवारबाव महावितरणच्या सुरक्षारक्षकांना मिळाले मानधन

रत्नागिरी : गेली चार वर्षे कुवारबाव महावितरणच्या सुरक्षारक्षकांना विभाग २ चे मानधन मिळत होते. ही बाब भारतीय सुरक्षारक्षक आणि श्रम कामगार युनियन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष हरेंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने हे योग्य मानधन मिळवून देण्यात यश आले.

चव्हाण यांनी ही बाब ताबडतोब रत्नागिरी महावितरणच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून रत्नागिरी नगरपालिका हद्द व शहरालगतच्या १५ किलोमीटरच्या आतमध्ये आस्थापना आहेत. युनियनचे पदाधिकारी संजयदादा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष हरेंद्र चव्हाण, त्यांचे सहकारी यांनी हा विषय आयरे यांच्यासमोर मांडला. त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. सुरक्षारक्षक हा बोर्डाचा कर्मचारी आहे. बोर्डानेच पत्रव्यवहार करायला पाहिजे, असे कळल्यानंतर शेवटी संघटनेने बोर्ड ऑफिसला आस्थापनेला पत्रव्यवहार करायला भाग पाडले आणि अखेर संघटनेला यश आले. यामुळे दरमहा पंधराशे रुपयांचे होणारे नुकसान थांबवले. याबद्दल संजय पाटील आणि हरेंद्र चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 26/Oct/2024