संगमेश्वर : ग्रामपंचायत परचुरी येथे जे. के. ट्रस्ट बॉम्बे आणि जेएसडब्लू फाउंडेशन प्रोजेक्ट यांच्या सौजन्याने सामाजिक बांधिलकीअंतर्गत एकदिवसीय मोफत पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी जेएसडब्लू हजे. फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर मयूर पिंपळे, कम्युनिटी ऑर्गनायझर भूषण दळवी, नाट्य जेके ट्रस्ट एफपीओ कॉर्डिनेटर जयप्रकाश त्रिवेदी, आरडीओ आदित्य कदम आणि सिद्धेश औंधकर, पशुवैद्यकीय डॉ. तनुश्रीया पाटीर, दीपक गांगुरडे, मनोज काजरेकर आणि चित्तरंजन बने यांनी एकत्रितपणे परचुरी गावातील ५४ शेतकरी आणि २५० जनावरांवर (गाई आणि म्हशी) उपचार केले. कृत्रिम गर्भधान, लसीकरण, पशु व्यवस्थापन, विभागीय योजना इ. शेतकऱ्यांना तपशीलवार समजावून सांगण्यात आले. या शिबिराचे आयोजक जे. के. ट्रस्ट बॉम्बे यांचे परचुरी गावातील सर्व पशुपालकांच्यावतीने आभार मानण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 26/Oct/2024














