रत्नागिरी : पावस बाजारपेठेतील रस्त्यावर भलेमोठे खड्डे

पावस : पावस गावातील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्याचा त्रास पादचाऱ्यांसह वाहनचालकाना होत आहे. बाजारपेठेतील रस्ता अतिशय खराब झाला असून, भलेमोठे खड्डे पडले आहेत.

या रस्त्यावर बांधकाम विभागाचे कर्मचारी नेहमी प्रवास करत असूनही त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. पावसमध्ये कायम पर्यटकांची गर्दी असते. पर्यटक येथे आल्यावर खड्यातून कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे नाराज होतात. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता प्रवाशांसाठी सुखकर करावा, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 26/Oct/2024