पुणे: उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगाने वाहू लागले असून यामध्ये आणखी वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण राज्यभरातील अनेक शहरांचे किमान (Weather Update) तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा खाली नोंदविण्यात येत आहे. काल गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईकरांना माथेरानचा फिल येत असल्याचे चित्र आहे. यापेक्षाही जास्त थंडी अहिल्यानगरमध्ये होती. तर पुण्यासह नाशिकचेही तापमान ७ ते ८ अंशावरती पोहोचले आहे.
राज्यात हुडहुडी वाढली आहे. अहिल्यानगरमध्ये ६.६ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी अहिल्यानगरमध्ये राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असून, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पारा घसरला आहे. उत्तर भारतातून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीची लाट पसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा ७ ते १० अंशांपर्यंत पोहचला आहे. अहिल्यानगर मध्ये ६.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)
अहिल्यानगर: ६.६
पुणे: ७.९
जळगाव: ७.०
कोल्हापूर: १४.४
महाबळेश्वर: ११.१
मालेगाव: ८.८
नाशिक: ८.२
सांगली: १२.३
सातारा: १०.०
सोलापूर: १३.२
छत्रपती संभाजीनगर: १०.८
परभणी: १०.४
अकोला: १०.०
अमरावती: १०.२
बुलढाणा: १२.२
गोंदिया: ८.०
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:51 AM 12/Dec/2025













