लांजा : जावडेच्या विद्यार्थ्यांनी बनवले आयुर्वेदिक उटणे

लांजा : हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल जावडे तसेच माध्यमिक आश्रम शाळा जावडे या प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी इको क्लब योजनेंतर्गत निसर्गातील औषधी वनस्पतीपासून आयुर्वेदिक सुगंधी उटणे बनवले असून, त्याला जावडे पंचक्रोशीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित होण्यासाठी तसेच व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करताना व्यक्तिमत्व विकास साधावा या दृष्टीने विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतीपासून तसेच निसर्गात सहज उपलब्ध होणारा वाळा, नागरमोथा, संत्र्याची साल, गुलाब पाकळी, चंदन, बावची, कापूरकचरी इत्यादी वस्तूंचा वापर करून आयुर्वेदिक सुगंधी उटणे तयार केले आहे.

संस्थेच्या अध्यक्षा अॅड. अपर्णा पवार व संस्थापक संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका वैदेही मिस्त्री, क्रांती करंबळे, स्मिता पाटील आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवली व त्यांच्याकडून हे नैसर्गिक सुगंधी उटणे तयार केले असून त्याला जावडे पंचक्रोशीतून चांगलीच मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 26/Oct/2024