कोकणातील विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘आयबीएस कॉम्प्युटर्स’ची आता देवरुखमध्येही शाखा; AI, सायबर सिक्युरिटीचे मिळणार अद्ययावत प्रशिक्षण

कोकणातील शिक्षण क्षेत्रात क्रांती; ॲड. अमित नागवेकरांच्या ‘आयबीएस’ची देवरुखमध्ये तिसरी शाखा कार्यरत

रत्नागिरी/देवरुख : कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणाऱ्या आणि संगणक प्रशिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ‘आयबीएस कॉम्प्युटर्स’ने (IBS Computers) आपल्या विस्ताराचे नवीन पर्व सुरू केले आहे. रत्नागिरी आणि चिपळूण पाठोपाठ आता देवरुख येथेही आयबीएस कॉम्प्युटर्सची तिसरी शाखा दिमाखात सुरू झाली असून, यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार आहे.

गरज रत्नागिरीची, संधी जगभरातील

रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना प्रोफेशनल संगणक प्रशिक्षणासाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागू नये, या उद्देशाने ॲड. अमित मधूकर नागवेकर यांनी २००१ मध्ये ‘आयबीएस कॉम्प्युटर्स’ची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून देश-विदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता हाच वारसा पुढे नेत संस्थेने संपूर्ण राज्यात शाखा विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे.

चिपळूणमध्ये विक्रमी प्रतिसाद

देवरुख शाखेपूर्वी नोव्हेंबर महिन्यात चिपळूण येथे संस्थेची दुसरी शाखा सुरू करण्यात आली. या शाखेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून, एकाच दिवशी ९४ विद्यार्थ्यांनी AI (Artificial Intelligence) सारख्या प्रगत कोर्सेससाठी नोंदणी करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

देवरुख शाखेचे उत्साहात उद्घाटन

दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी देवरुख शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री श्री. रवींद्रजी माने, माजी नगराध्यक्ष सौ. मृणालताई शेटे, माजी जिल्हा परिषद सभापती श्री. रोहनजी बने, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयबीएस कॉम्प्युटर्स चिपळूणचे केंद्रप्रमुख श्री. राज चव्हाण व सौ. भक्ती चव्हाण यांनी संस्थेचे संस्थापक ॲड. अमित नागवेकर, देवरुख केंद्रप्रमुख ॲड. सरताज कापडी, सौ. सविता कापडी आणि ट्रेनिंग हेड श्री. कैलास मोंडे यांचे विशेष आभार मानले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे धडे आता देवरुखमध्ये काळाची गरज ओळखून आयबीएसने देवरुख शाखेत खालील प्रगत कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत:

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)

सायबर सिक्युरिटी (Cyber Security)

क्लाऊड कम्प्युटिंग (Cloud Computing)

यावेळी बोलताना उपस्थितांनी संस्थापक ॲड. अमित नागवेकर आणि संचालिका सौ. प्रेरणा अमित नागवेकर यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. “तंत्रज्ञानाच्या युगात स्थानिक विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या नवीन शाखेमुळे आता देवरुख आणि संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संगणक प्रशिक्षण आपल्या हक्काच्या गावातच मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 13/Dec/2025