मंडणगड : नगरपंचायत व्यापारी संकुलातील एका महिलेस शिवीगाळ करून, लज्जा उत्पन्न करणारे वर्तन केल्याप्रकरणी संजय बाबूराव राणे (वय ६०, राहणार साईनगर, मंडणगड) यांच्या विरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटने संदर्भात संबंधित महिलेने पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीतील माहितीनुसार ११ डिसेंबर रोजी दुपारी १.३०. ते २.३० च्या दरम्यान फिर्यादी या नगरपंचायत व्यापारी संकुलात नेहमीप्रमाणे काम करत असताना संशयित हा फिर्यादी यांच्या दुकान गाळ्याजवळ आला असता फिर्यादी यांनी मंडणगड नगर पंचायत कार्यालयात दिलेल्या तक्रारीबद्दल विचारणा केली असता, संशयिताने फिर्यादी यांना अश्लिल शिवी देत, तु मला कोण विचारणारी, मी तक्रार मागे घ्यावी असे वाटत असले तर मला पन्नास हजार रुपये दे, अशी धमकी दिली व फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन व शिवीगाळी केली व फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडून टाकले. संशयित यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:28 PM 13/Dec/2025










