मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाराष्ट्र शासन, मंडणगड तालुका कृषी विभाग आणि माहू-बोरघर ग्रामपंचायत यांच्या सहकायनि माहू-बोरघर परिसरात बंधारा बांधण्यात आला. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण यांनी पाणी अडवल्यामुळे काय फायदे होतात, कोकणात भरपूर पाऊस पडतो, परंतु डोंगर उताराची जमीन असल्यामुळे पडणारे पावसाचे पाणी थांबत नाही.
त्यामुळे डोंगरी भागात पाणी साठवण किती आवश्यक बाब आहे याविषयी माहिती सांगितली. बंधारा बांधण्यासाठी मंडणगड तालुका कृषी कर्मचारी जे. एम पाटील., ग्रामसेविका सुप्रिया चांदिवडे, एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. मुकेश कदम, डॉ. संगीता घाडगे, स्वयंसेवक-स्वयंसेविका ग्रामस्थ उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभायेंच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संदीप निर्वाण, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. संगीता घाडगे, डॉ. महेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. आभार डॉ. मुकेश कदम यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 13/Dec/2025














