Ratnagiri : खालगाव येथे बेकायदा दारू विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव- मधली गोताडवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार रात्री करण्यात आली. महादेव रमा खोल्ये (वय ६३, रा. मधली गोताडवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिला पोलिस हेड कॉस्टेबल योगिता नाटूस्कर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री संशयित विना परवाना गावठी हातभट्टीची ५०० रुपयांची ५ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 15/Dec/2025