खेड : कलाश्रय आणि अभिनय, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जयदेव हटंगडी स्मृती एकांकिका लेखन स्पर्धा ‘एकांकिकाकार २०२५’ चा निकाल नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्रासह देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या प्रतिसादामुळे यंदा तब्बल ९५ नव्या एकांकिका स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या आहेत.
या स्पर्धेत नीलेश महिगावकर यांच्या ‘बैल बाजार’ या एकांकिकेने प्रथम, डॉ. अनघा राजपूत यांच्या ‘निर्णय’ या एकांकिकेला द्वितीय, तर अमित देशमुख यांच्या ‘आयाम’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिके ‘खिळे से खिळे तक’ योगेश धनंजय बाठवे, ‘त्रि पाऊंड’ ऋषिकेश रामचंद्र रुपाली, ‘ई-स्त्री’ डॉ. अमित शिंदे, ‘लुईश दागोरी ते पिकासो’ डॉ. श्याम शिंदे, ‘गुंगारा’ महेंद्र उटकनाथ तेंडुलकर यांना प्राप्त झाली.
परीक्षण गेली तीन वर्षे मकरंद अनासपुरे आणि दासू वैद्य हे करत आहेत. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मनाली जाधव, ओमकार जाधव, रोशन मोरे, संकेत गुरव, शिवराम गावडे, परिण मोरे यांनी परिश्रम घेतले. प्राप्त गेल्या तीन वर्षांतील पारितोषिक एकांकिका पुस्तकरूपात प्रकाशित करून एकांकिकाप्रेमींना त्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच पुढील वर्षापासून या लेखन स्पर्धेत हिंदी एकांकिकांचाही समावेश करण्यात येणार असल्याची माहिती अभिनेते व दिग्दर्शक अभिजित झुंजारराव यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 15/Dec/2025













