रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा दर्गा येथील चढावात शनिवार 13 डिसेंबर रोजी दुपारी 12.40 वा. सुमारास डांबर मिश्रीत खडी भरलेला डंपर मागून येणाऱ्या स्विफ्ट कारवर उलटून सातारा येथील 6 जण जखमी झाले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रज्ञा नितीन जाधव (29), स्पृहा नितीन जाधव (6), वृंदा नितीन जाधव (4), चालक नितीन जाधव, ऋषीकेश राजेंद्र शिंदे (26), ऋतुजा राजेंद्र शिंदे (23 सर्व रा. सातारा) अशी अपघातातील सहा जखमींची नावे आहेत. तर डंपर चालक विपूल थावरा दामोर (मुळ रा. रत्नावाडा, तहसिल पुनाली, जि. डुंगरपूर, राजस्थान सध्या रा. रवि इंफ्रा कंपनी देवळे फाटा संगमेश्वर) हा शनिवारी दुपारी आपल्या ताब्याती डंपर (एमएच-08-एपी-5652) मधून डांबर मिश्रीत गरम खडी घेउन दोभोळे ते रत्नागिरी असा येत होता.
तो हातखंबा दर्गा येथील चढावात आला असता चढावात डंपर अचानकपणे उलटला. हा डंपर पाठीमागून सातारा ते रत्नागिरी येणारी स्विफट कार (एमएच-11-एव्ही-9824) वर उलटल्याने डंपरमधील गरम डांबर मिश्रीत खडी या कारवर पडून हा अपघात झाला. याबाबत हातखंबा गावच्या पोलिस पाटिल शर्वरी शिवाजी सनगरे (47, रा. सनगरेवाडी हातखंबा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 15/Dec/2025













