चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामाला गती

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठ्या उड्डाण पुल्पचे काम अनेक दिवस रखडले होते. मात्र, आता या कामाने गती घेतली आहे. गर्डर टाकण्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

चिपळूण शहरातून मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात मोठा काम पूल जात आहे. सुरुवातीला या उड्डाण पुलासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले होते आणि सस्पेन्शन केबलच्या माध्यमातून हा पूल उभारण्यात येणार होता. त्या दृष्टीने कामही सुरू होते, परंतु निर्माणाधीन असलेला हा गतवर्षी बहादूरख चौकामध्ये कोसळला, यामध्ये सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही. मात्र, त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा पूल सस्पेन्शन केबल तंत्रज्ञानाने न उभारण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने म्हणजे गर्डरच्या माध्यमातून पूल उभारा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आधी बांधलेल्या पिलरच्या मध्ये आणखी एक पिलर वाढविण्यात येत आहे.

बहुतांश पिलरचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले असून, जुन्या पिलरचे कटिंगचे काम सुरू आहे. महामार्गावर या उड्डाण पुलाच्या कामासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक टीम कार्यरत झाल्या आहेत. रात्रीच्यावेळी फ्लड लाईट लावून हे काम करण्यात येत आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामाची गती वाढली असून, लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

सर्व्हिस रोडला खेटून लावलेले पत्रे हटवावेत…
चौपदरीकरण अंतर्गत होणाऱ्या या उड्डाण पुलाचे काम जोरदार सुरू झाले आहे. त्यासाठी संबंधित कंपनीने महामार्गावरील एकेरी मार्गावर दोन्ही बाजूला काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या लगतच बॅरिकेडस् लावले आहेत. यामुळे येणा-जाणाऱ्या वाहनांना रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे साईडपट्टीच शिल्लक राहिली नसून अनेकवेळा अपघात होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी एक महिलेचा अपघात होऊन ती जायबंदी झाली. काँक्रीटच्या रस्त्याला खेटून पत्रे लावल्याने हा रस्ता वाहनांसाठी कमी पडत आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 26/Oct/2024