Guhagar : अंजनवेल केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांना सुरुवात

गुहागर : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत अंजनवेल केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा अंजनवेल केंद्राच्या केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी क्रीडा नगरीमध्ये सुरू झाली आहे. सदर क्रीडा स्पर्धेसाठी पालक, ग्रामस्थांकडून कबड्डी, खोखो, लंगडी, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळी फेक , धावणे, उंच उडी इत्यादी क्रीडा प्रकारांसाठी चांगल्या प्रकारची मैदाने तयार करण्यात आलेली आहेत. आज सोमवार दिनांक १५ डिसेंबर२०२५ रोजी सकाळी नऊ वाजता प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पडला. सर्व विजेते व उपविजेते संघांना व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विजेते उपविजेते स्पर्धकांना चषक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:48 PM 15/Dec/2025