गुहागर : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली प्रशालेतील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘खाद्य महोत्सव’ साजरा केला. तळवली ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी विविध डेज साजरे करतात. त्यामध्ये खाद्य महोत्सव हा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. या खाद्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभास पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार सुजाता चव्हाण, सहसचिव महेश कोळवणकर, मनोज नायर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रदीप चव्हाण, मुख्याध्यापक एम.ए. थरकार, प्रा. अमोल जड्याळ व इतर सर्व प्राध्यापक यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते खाद्य महोत्सवाच्या स्टॉलचे उदघाटन करण्यात आले. तसेच संस्थेचे सचिव सुधाकर चव्हाण, सहसचिव मंगेश जोशी, खातु मसाले उद्योगाचे श्री. खातू यांनी खाद्य महोत्सवास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
या खाद्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. भेळ, शेव पुरी, कच्चे दाबेली, आळुवडी, कोथिंबीर वडी, चिकन पुरी, चिकन बिर्याणी, चिकन रोल, लॉली पॉप, वडा पाव, अंडा ब्रेड, लस्सी, आईस्क्रीम असे अनेक पदार्थ स्टॉलवर विक्री साठी ठेवले होते. त्याला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे स्टॉलधारक विद्यार्थ्यांच्या चेहन्यावर हास्य उमटलेले दिसत होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ब-याच गोष्टी शिकता आल्या. खाद्य महोत्सवात अकरावी व बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मार्गदर्शक प्रा. अमोल जड्याळ, प्रा. सौ. कांबळे, प्रा. सौ. जड्याळ, प्रा.कु. सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले. तसेच गुरुनाथ कारेकर, अंकुश पिलवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. खाद्य महोत्सव यशस्वी केल्याबद्दल प्राचार्य श्री. एम.ए. थरकार सर यांनी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 15/Dec/2025













