रत्नागिरी : वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे आता वाहनधारक इलेक्ट्रिक, सीएनजी आधारित वाहन खरेदीकडे कल वाढत आहे. रत्नागिरीकर ही आता पेट्रोल, डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. मागील दोन वर्षात रत्नागिरीत ई-वाहने खरेदीचा टक्का वाढत आहे. १ जानेवारी ते डिसेंबर २०२५ पर्यंत १५०० हुन अधिक वाहनांची खरेदी झालेल्या आहेत. येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहन खरेदीची संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकारने मागील एप्रिलमध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. ते २०३० पर्यंत लागू राहणार आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या नोंदणीवर कमाल १० ते १५ टक्के म्हणजे ३० हजार ते २० लाखांपर्यंतची सवलत देण्यात येत आहे. चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. ५० ते २५० किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेच्या चार्जिंग स्टेशनला पाच लाखांपर्यंत, तर २५० ते ५०० केव्हीच्या चार्जिंग स्टेशनसाठी १० लाखांपर्यंतची सूट मिळत आहे.
त्यामुळे मुंबई, पुणे, हैदराबाद या मेट्रोसिटी नंतर आता कोकणात ही इलेक्ट्रिक वाहन खरेदीस चांगला प्रतिसाद लाभत आहे. विशेषतः दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, पाडवा यासह वाढदिवस, चांगला दिवस बघून पेट्रोल ऐवजी ई, सीएनजी आधारित दुचाकी, चारचाकी खरेदी करण्याचा कल रत्नागिरीकरांचा वाढत आहे. आरटीओने दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात हजारो इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. या मध्ये सर्वाधिक दुचाकी संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले.
इतर शहराच्या तुलनेने संख्या कमी असली तरी कोकणात ही इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी खरेदीचा उत्साह वाढत आहे. सोसायट्यांमध्ये चार्जिंगची सोय, सबसिडी, विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्स अशा बाबींमुळे इलेक्ट्रिक वाहन नोंदणी वाढल्याचे दिसून आले.
रत्नागिरी जिल्ह्यात १ जानेवारी ते डिसेंबर २०२५ या काळात दीड हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. ऑटोरिक्षा, मालवाहू, हायब्रीड चारचाकी खरेदी झाली असून त्याचीही वाहनांची नोंद आहे. येत्या काळात आणखी इलेक्ट्रिक वाहनांची नोंदी होतील- राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 15/Dec/2025













