Sangameshwar : आंबव पोंक्षे येथे बांधले १० वनराई बंधारे

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीतर्फे, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायती अंतर्गत गावातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी विविध ठिकाणी वनराई बंधारे बंधारे बांधण्यात आले आहेत. गावातील फरशी, जुवले वाडी, घडशीवाडी, भुवडवाडी, अशा विविध १० ठिकाणी वनाराई बंधारे बांधण्यात आले आहेत. या साठी सरपंच शेखर उकार्डे, उपसरपंच मंगेश मांडवकर, सदस्य प्रिया सुवरे, सुनील घडशी, रिया मायनक, दीपाली कुडतडकर, निधि भायजे, ग्रामपंचायत अधिकारी अभिजित चव्हाण, पूर्वा भुवड, अनघा नेटके, अभि चाळके आदिंसह गावातील गावकरी, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 15/Dec/2025