Pawas Bus Stand : पावस बसस्थानकातील शौचालय टाकीची अखेर साफसफाई

रत्नागिरी : पावस बसस्थानकामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेल्या शौचालय टाकीचे काम योग्य त-हेने न झाल्यामुळे व ती वारंवार भरत असल्यामुळे ती साफ करण्यासाठी परिवहन खात्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे या शौचालयाला टाळे ठोकले होते. पाठपुरावा केल्यावर सहा महिन्यांनी अखेर न. प.ने शौचालयाच्या टाकीची साफसफाई केली आहे. पावस ग्रा.पं. तर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख ६७हजार रुपये खर्च करून नव्याने शौचालय उभारले.

त्यानंतर ९९ लाख खर्चुन बस स्थानक परिसर सुशोभित केला; परंतु शौचालय टाकीचे बांधकाम योग्य न झाल्यामुळे वारंवार ती भरत होती. प्रत्येकवेळी साफसफाई करणे अवघड झाले होते. अखेर त्या शौचालयाला कुलूप लावले. अखेर शौचालयाची साफसफाई केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 15/Dec/2025