Ratnagiri : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात १५ ते २४ डिसेंबरपर्यंत छंदोत्सव

रत्नागिरी : शहरातील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या छंदोत्सव १५ ते २४ डिसेंबरपर्यंत होणार आहे. १८ डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन होईल. २१ रोजी दुपारी २ वाजता प्रदर्शनांचे उद्घाटन होईल यात फोटोग्राफी, रांगोळी, चित्रकला, विविध हस्तकला स्पर्धा व फूड स्टॉलचे उद्घाटन होईल.

त्याच दिवशी दुपारी ३ वाजता जवाहर क्रीडांगण येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. सायं ४ वा. छंदोत्सव व फॅन्सी ड्रेस स्पर्धा उद्घाटन, ५ वाजता शामराव करंडक एकांकिका स्पर्धा उद्घाटन व सादरीकरण होईल. २० रोजी सकाळी ११ वाजता घंटानाद सन्मान प्रदान केला जाईल आणि गीत गायन स्पर्धेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. दुपारी १२ वाजता एकल नृत्य स्पर्धा विविध गुणदर्शन कार्यक्रम होतील आणि सायंकाळी ४ वाजता सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. २२ ते २४ डिसेंबरपर्यंत सर्व क्रीडा प्रकाराचे मैदानी सामने पार पडतील. सायंकाळी ४.३० वाजता वार्षिक क्रीडा स्पर्धेतील स्पर्धकांना गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 15/Dec/2025