खेड : सोनगाव धामणदेवी येथील घरडा कॉलनी परिसरात बेकायदेशीर दारूसाठा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एकास अटक केली आहे. ही कारवाई १५ डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार प्रवीण कृष्णा खांबे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रोशन रवींद्र घाग (३५, रा. सोनगाव, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्याकडे कोणताही वैध परवाना नसताना देशी व विदेशी दारूच्या बाटल्या साठवून ठेवल्याचे आढळून आले. या कारवाईत एकूण ६ हजार ८६५ रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 17/Dec/2025













