खेड : राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेसाठी ज्ञानदीप प्रशालेतील अथर्व पाटील याची निवड

खेड : तालुक्यातील भडगाव येथील कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विभागस्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत १९ वर्षे मुलांच्या संघाने विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. या संघातील अथर्व पाटील या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व सातारा जिल्हा क्रीडा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 26/Oct/2024