Khed : दारूच्या नशेत भावाला मारहाण

खेड : तालुक्यातील खोपरेवाडी गावात दारूच्या नशेत बडबड करणाऱ्या भावाला समजावण्याचा प्रयत्न केल्यानेच मोठ्या भावावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत संदीप कोंडीराम खराबते (४५, व्यवसाय शेती, रा. खोपरेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ सुरेश कोंडीराम खरावते (वय ४०, रा. खोपरेवाडी) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी सुरेश खरावते हा दारूच्या नशेत बडबड करत असताना फिर्यादीने त्याला तसे करू नकोस, असे समजावले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला हाताच्या थापटीने मारहाण केली. तसेच त्याने गंभीर दुखापत केली व डोक्यात दगड मारून जखमी केले. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी १६ डिसेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 19-12-2025