साखरपा ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-साखरपामार्गे रत्नागिरी जाणारी बस गेली अनेक वर्षे बंद होती. प्रवाशांच्या व नोकरदार वर्गाच्यादृष्टीने ही बस सोयीची होती; मात्र ती बंद केल्यामुळे गैरसोय निर्माण झाली होती.
प्रवाशांची ही समस्या कोंडगाव ग्रुपग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी जाणून घेतली आणि याबाबत पाठपुरावा केला. आठल्ये यांनी देवरूख बसआगारातील अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर आमदार किरण सामंत यांना देवरूख-साखरपामार्गे रत्नागिरी गाडी सुरू करण्यासाठी निवेदन दिले. व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधून अखेर देवरूख येथून सुटणारी देवरूख-साखरपामार्गे रत्नागिरी गाडी सुरू करण्यात आली. देवरूख येथून साडेआठ वाजता सुटून ती साखरपा येथून सव्वानऊ वाजता रत्नागिरीकडे मार्गस्थ होते. त्यामुळे साखरपा ते हातखंबापर्यंतच्या प्रवाशांना ही गाडी सोयीची झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 19-12-2025














