रत्नागिरी : सूक्ष्म, लघउद्योजक व पारंपरिक कारागिर यांचे ‘दे आसरा फाऊंडेशन संस्था व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (२३ डिसेंबर) जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, रत्नागिरी येथे उद्योजकता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी उद्योजक मार्गदर्शन मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.
लाखो सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजक आपले व्यवसाय चालवत आहेत. हे व्यवसाय स्थानिक रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे स्त्रोत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देतात मात्र अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल मार्केटिंग, शासकीय योजनांचा लाभ, वित्त व्यवस्थापन, उत्पादनाचा दर्जा, ग्राहक संवाद यासारख्या विविध अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच सुक्ष्म, अतिसुक्ष्म उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टता प्राप्त करता यावी, त्यांचे ज्ञानवधर्न, त्यांच्या क्षेत्रातील इतर उद्योजकांसमवेत ओळखी होणे त्यांच्या अडचणींना उत्तरे मिळावीत या उददेशाने हा “उद्योजक मेळावा” घेण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 22/Dec/2025














