Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते.
लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थी महिलांना मिळावा म्हणून सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ( Ladki Bahin Yojana )
लाडक्या बहिणींना ई- केवायसी करण्यासाठी मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी ई केवायसी केली असल्याची माहिती समोर आली आहे. ( Ladki Bahin Yojana )
अद्याप 30 ते 40 लाख महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीय. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई केवायसी न केल्यास 40 लाखांहून अधिक महिला योजनेतून अपात्र होतील, अशी माहिती महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अपात्र बहिणींचा शोध घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ( Ladki Bahin Yojana )
सद्यस्थितीत 2 कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ( Ladki Bahin Yojana )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 23-12-2025













