रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे दिनांक 17 ते 23 डिसेंबर 2025 या कालावधीत शिरगाव येथे सात दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचा विषय
“Youth for Sustainable Development – Special Focus on Watershed Management and Wasteland Development”
असा होता. या विषयाच्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, आरोग्य, स्वच्छता व सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम राबविण्यात आले.
शिबिरादरम्यान NSS स्वयंसेविकांनी श्रमदानातून जलस्वच्छता,वनराई बंधारा बांधणी यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबविले. यामुळे जलसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवातून समजले.
शिबिरामध्ये विविध विषयांवरील Guest Lectures आयोजित करण्यात आले.Circular Economy: Waste to Wealth Model या विषयावर भाऊ काटदरे यांनी मार्गदर्शन केले.
E-waste Management या विषयावर श्री. मनीष आपटे (Founder – RatnaGreen Techno Services) यांनी व्याख्यान दिले.
Organic Farming या विषयावर कृषी अधिकारी गावडे सर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व स्पष्ट केले.
तसेच Water Conservation: Role of Youth या विषयावर श्री. महेश पालकर व श्री. समित घुडे यांनी युवकांच्या भूमिकेवर प्रभावी मार्गदर्शन केले.
आरोग्यविषयक जाणीव निर्माण करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे Eye Check-up व Blood Check-up Camp आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे स्वयंसेविकांना आरोग्य तपासणीचे महत्त्व समजले.
कौशल्यविकास उपक्रमांतर्गत फॅब्रिकपासून कानातले बनवण्याचे कृतिसत्र आयोजित करण्यात आले. हे कृतिसत्र महर्षी कर्वे महिला महाविद्यालयामधील डिप्लोमा इन टेक्सटाइल अँड फॅशन डिझायनिंग इन्स्ट्रॅक्टर सौ. वृषाली नाचणकर मॅडम यांनी घेतले असून स्वयंसेविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
शिबिराच्या संपूर्ण कालावधीत राष्ट्र सेविका समितीतर्फे योग प्रशिक्षक दररोज योग प्रशिक्षणासाठी उपस्थित राहत होते, ज्यामुळे स्वयंसेविकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा समतोल साधला गेला.
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतर्गत शिरगाव गावातील महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू समारंभाच्या वेळी NSS स्वयंसेविकांनी जाकडी नृत्य, जोगवा, योगा डान्स, गरबा तसेच समूहगीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमांसाठी शिरगाव ग्रामपंचायत सरपंच मा. फरीदा काझी, ग्रामसेवक मा. उल्हास कोळी, रत्नागिरी प्रकल्प समितीचे सदस्य यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरासाठी रत्नागिरी प्रकल्प अध्यक्षा मा. विद्याताई कुलकर्णी, प्रकल्पप्रमुख मा. श्री. मंदार सावंतदेसाई, बीसीए कॉलेजच्या प्र. प्राचार्या मा. स्नेहा कोतवडेकर यांनी NSS स्वयंसेवकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
या शिबिरातून विद्यार्थिनींमध्ये जलसंवर्धनाचे महत्त्व, पर्यावरणाबाबतची जाणीव, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण व सेवा वृत्ती अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 23-12-2025














