मुंबई : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय मोरे यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
आगामी महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे “स्टार प्रचारक” म्हणून 40 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान असलेल्या आमदार भावना गवळी यांना महापालिका स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.
शिवेसना स्टार प्रचारकांची यादी
- एकनाथ शिंदे ,मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री
- रामदास कदम, नेते
- गजानन कीतीकर, नेते
- आनंदरावअडसूळ, नेते
- डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते
- प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री
- डॉ.निलमताईगोन्हे, नेत्या
- मिनाताई कांबळी, नेत्या
- गुलाबराव पाटील, नेते व मंत्री
- दादाजी भुसे, उपनेते व मंत्री
- उदय सामंत, उपनेते व मंत्री
- शंभूराजदेसाई, उपनेते व मंत्री
- संजय राठोड, मंत्री
- संजय शिरसाट, प्रवक्ते व मंत्री
- भरतशेठगोगावले, उपनेते व मंत्री
- प्रकाश आबिटकर, मंत्री
- प्रताप सरनाईक, मंत्री
- आशिष जयस्वाल, राज्यमंत्री
- योगेश कदम, राज्यमंत्री
- दिपककेसरकर, प्रवक्ते व आमदार
- श्रीरंगबारणे, उपनेते व खासदार
- धैर्यशील माने, खासदार
- संदीपानभुमरे, खासदार
- नरेश म्हस्के, खासदार
- रवींद्रवायकर, खासदार
- मिलिंद देवरा, खासदार
- दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री
- शहाजीबापू पाटील, उपनेते व माजी आमदार
- राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार
- मनिषाकायंदे, सचिव व आमदार
- निलेश राणे, आमदार
- संजय निरुपम, प्रवक्ते
- राजू वाघमारे, प्रवक्ते
- ज्योती वाघमारे, प्रवक्ते
- पूर्वेशसरनाईक, युवासेनाकार्यध्यक्ष
- राहुल लोंढे, युवसेना सचिव
- अक्षयमहाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना
- समिरकाझी, कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
- शायनाएन.सी., राष्ट्रीय प्रवक्त्या
- गोविंदाअहुजा, माजी खासदार
शिवसेनेनं टायमिंग साधलं
एकीकडं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाल्याचं आज जाहीर केलं आहे. नेमक्या याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीत युती आघाडी होत असतात. काही जणांची युती जनतेसाठी होते, जशी आमची महायुती आहे. आता झालेल्या युती सत्तेसाठी, खुर्चीसाठी, स्वार्थासाठी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 25-12-2025













