रत्नागिरीत नाताळ उत्साहात साजरा

रत्नागिरी : जगाला शांतीचा मार्ग देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्म ‘नाताळ’ गुरुवारी (ता. २५) जिल्ह्यात मोठ्या उत्साहात करण्यात आला. जिल्ह्यातील विविध ठिकाणांच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रम झाले.

पहाटेपासूनच ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना केली. नाताळनिमित्त शहरातील मिलाग्रीस चर्च, हंटर मेमोरियल चर्च, जेम्स चर्च, ए. जी. चर्चमध्ये सलग दोन दिवस नाताळ सण विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा झाला. भाजीमार्केट येथील मिलाग्रीस चर्चवर विशेष रंगरंगोटी केली होती. ख्रिसमस ट्री ला ही विद्युत रोषणाई केली होती. चर्चच्या परिसरात प्रभू येशूची जन्मकहाणी सांगणारा गोठा तयार करण्यात आला. नाताळला पहाटे जिल्ह्यातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली. त्यानंतर सांताक्लॉझने खाऊवाटप केले. ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणानिमित्त शहरातील बाजारपेठाही सजल्या होत्या. बाजारात विविध वस्तू विक्रीला आल्या होता, त्यामध्ये ख्रिसमस ट्री, विद्युतमाळा, फुलांच्या माळा, घंटा, चांदण्या, सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या, चॉकलेटस्‌, भेटवस्तू यांचा समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 26-12-2025