चिपळूण : शहरातील पागमळा भागातील एकता अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका आयटी अभियंत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामध्ये आशिष किरण शेडगे (४० मूळ रा. आकुर्डी पुणे) याचा मृत्यू झाला आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट देत पंचनामा केला. आशिष शेडगे हा आयटी अभियंता होता. पुणे येथील एका कंपनीमध्ये तो काम करत होता. तर पत्नी चिपळूणमध्ये नोकरीला होती. त्याला बियर पिण्याची सवय होती. बुधवारी रात्री तो बियर पिऊन आला आणि पुन्हा घरी त्याने बियर घेतली. पत्नी व मुलांनी जेवण करून झोपी गेले. यानंतर रात्री त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले. पत्नीने फासाची दोरी कापून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलीस अधिक तपास करीत असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 26/Dec/2025














