Maharashtra Police Bharti 2025 Latest Update: पोलीस दलात भरती (Maharashtra Police Recruitment) होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एकअतिशयमहत्वाची बातमी समोरआली आहे. गेल्या अनेक महिने रखडलेल्या आणि अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या पोलीस भरती च्या ( Maharashtra Police Recruitment) प्रक्रियेला राज्यातून उदंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे . परिणामी पोलिस दलामध्ये भरती होण्यासाठीची स्पर्धा ही आता कमालीची वाढली असल्याचे या वर्षीच्या आकडेवारीतून दिसून येतंय . त्यामुळे उमेदवा रां ची निवड प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक होणार असून उमेदवारांनाही अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.
(Maharashtra Police Bharti 2025 Latest Update)
Maharashtra Police Bharti 2025 : तब्बल 15, 405 जागा, राज्यभरातून लाखो अर्ज
अलीकडेच राज्य सरकारकडून पोलीस भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. ज्यामध्येमुंबईसह राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने भरतीची घोषणा केलीहोती. भरती प्रक्रियेसाठी (Maharashtra Police Bharti) अर्ज करण्याची शेवटची तारीख आधी 30 नोव्हेंबर होती. मात्र अर्ज करण्यास उमेदवारांना येतअसलेल्या अडचणी लक्षातघेता अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होताआणि 7 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अशातचआता शिपाई, चालक, बँड्समन, कारागृह शिपाई, एसआरपीएफ अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तब्बल 15, 405 जागा या भरतीतुन भरण्यात येणार आहेत.
Maharashtra Police Bharti 2025 Latest Update: मैदानी चाचणी प्रक्रिया 20 जानेवारीपासून सुरू
दरम्यान, यामोठ्यापोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अर्जदाखलझालेआहे. ज्यामध्ये 15 हजार 405 पदांसाठी तब्बल 16 लाख 52 हजार 850 उमेदवारांनी अर्ज केल्याचीमाहितीआहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील उच्चशिक्षितांची संख्याहीमोठी असल्याचीमाहितीआहे. भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा मैदानी चाचणी असून 20 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होईल. तर सर्वात कमी म्हणजेच केवळ 19 पदे ही बँड्समनची भरण्यात येणार असल्याचीमाहितीआहे. मात्र, बँड्समनच्या एका पदासाठी सरासरी 895 उमेदवार स्पर्धेत आहेत.
Maharashtra Police Recruitment : 19 जागांसाठीतब्बल 17,000 हजारअर्ज
शिपाई: जागा- 12, 702 अर्ज- 7,86,500
चालक: जागा- 478 अर्ज- 1,80,000
बँड : जागा- 19 अर्ज- 17,000
कारागृह शिपाई: जागा- 554 अर्ज- 3,34,350
एसआरपीएफ : जागा- 1,652 अर्ज- 3,35,000
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:02 26-12-2025













