रत्नागिरी : यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाच्या ११७ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा १७ टक्के जास्त पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची समस्या काही अंशी निवळली आहे.
पावसाने समाधानकारक वाटचाल केल्याने आणि जलयोजनांची कामे अंतिम टप्प्यात सुरू असल्यामुळे पाणीटंचाईपासून काही गावांत सुटका होणार आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे स्वरूप गंभीर झाले होते. मात्र, यावर्षी पाऊस वेळेवर सुरू झाल्याने दिलासा मिळाला होता. या कालावधीत गावांनी आपल्या कार्यान्वयीत असलेल्या पाणी योजना एक दिवसा आड सुरू केल्या होत्या. मात्र, यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यासाठी करावी लागणारी कसरत कमी होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 24-09-2024