Ratnagiri: ‘थर्टी फस्ट’वर पोलिसांची करडी नजर !

रत्नागिरी : थर्टी फर्स्ट साजरा करताना कोणीही दारू पिऊन वाहने चालवू नये. दापोली तालुक्यात नाकाबंदीच्या ठिकाणी सर्व वाहन चालकांची ब्रेथ अँनालायझरच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. कुणी दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर यांनी दिला आहे.

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दापोली येत आहेत. दापोली मध्ये अंदाजे 1 लाख पर्यटक येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलही सज्ज झाले आहे. पोलिस दलामार्फत धोकादायक ठिकाणी बॅरिकेट लावण्यात आली आहेत. दापोली पोलीस दल, जीवरक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, मच्छीमार, सागरी सुरक्षा रक्षक आदींच्या सहाय्याने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर दापोली पोलीस निरीक्षक श्री महेश तोरसकर यांनी पर्यटकांना काही सूचना केल्या आहेत त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. थर्टी फस्टच्या दिवशी समुद्रकिनारी कोणतीही दुर्घटना घडू नये याकरता आम्ही बंदोबस्त तैनात ठेवला आहे. त्याकरता आम्ही सागर सुरक्षा रक्षक, मच्छिमार आणि स्थानिक ग्रामस्थांची मदत घेत आहोत असे दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी सांगितले आहे.

समुद्रकिनारी जाताना समुद्र खोलीचा अंदाज घ्या. कोणताही आताताईपणा करू नका. अशातच चुकांमुळे समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना घडल्या आहेत. पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर येताना कोणीही गाडी समुद्रकिनाऱ्यावर नेऊ नये. जिथे पार्किंगची सोय केली आहे त्या ठिकाणीच पार्किंग करावी, दारू पिऊन कोणी वाहन चालवू नका. दारू पिऊन वाहन चालवण्याने अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्ट साजरा करताना दारू पिऊन वाहन चालवू नका असे आवाहन श्री. महेश तोरस्कर यांनी केले आहे.

तळीरामांवर करडी नजर
थर्टी फर्स्ट साजरा करताना दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेन्थ अॅनलाईझरने वाहन चालकाची तपासणी होणार आहे दारू पिऊन वाहन चालवताना कोणी आढळल्यास कठोर कारवाई होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:30 PM 30/Dec/2025