चिपळूण : गोवळकोट, माप भागातील नागरिकांना दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या मचूळ व अशुद्ध पाण्याच्या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पदभार स्वीकारताच या विषयावर काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष गोवळकोट जॅकवेल व नदीपात्राची पाहणी करत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि तात्काळ उपाययोजना राबविण्याचे आदेश दले.
गोवळकोट-माप परिसरात पुरवण्यात येणारे पाणी मचूळ येत असल्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत नगराध्यक्षांनी या बैठकीत पाणीपुरवठ्याचे स्रोत, जुन्या व खराब झालेल्या पाईपलाईन, तांत्रिक अडचणी तसेच पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतील त्रुटी यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
या संदर्भातील चर्चेदरम्यान कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला. भविष्यात गोवळकोट विभागाला पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी पाणीस्त्रोत, नवीन स्वतंत्र पाईपलाईन, अतिरिक्त जॅकवेल व्यवस्था, तात्पुरते व दीर्घकालीन उपाय यावर प्रत्यक्ष पातळीवर करण्यात विचारमंथन आले.
नगराध्यक्षांनी पाणीपुरवठा विभागाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व नियमित पाणीपुरवठा करणे ही नगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. गरज भासल्यास नवीन कामांचे प्रस्ताव, निधी व मंजुरी प्रक्रिया तातडीने राबवावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 31/Dec/2025













