राज्यातील २९ महापालिकांसाठी ३३ हजार अर्ज दाखल; २,८६९ जागांसाठी निवडणूक

मुंबई : राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज्यभरातून ३३ हजार ६०६ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यभरातील २९ महापालिकांच्या ८९३ प्रभागांमधील दोन हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

तब्बल चार वर्षांपेक्षा जास्त काळाच्या प्रतीक्षेनंतर या निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या प्रचंड होती. त्यातच सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी लढविण्यासाठी अनेकांची आकांक्षा होती. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. ही नाराजी दूर करताना पक्ष नेतृत्वाची मात्र दमछाक झाली. अनेक ठिकाणी अंतर्गत कलह ना शमविताच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या मोठी आहे. मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये बहुसदस्यीय पद्धती असल्यानेही उमेदवारांची संख्या जास्त आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 01-01-2026