Ratnagiri : जाकादेवीत आज किसान भवन नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या किसान भवन नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा १ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्हा पालक मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

गेली अनेक वर्षे हे सर्व कार्यक्रम मंडळाच्या जुन्या इमारतीमध्ये होत होते, जी अतिशय जीर्ण झालेली होती. समाजाला नव्या व प्रशस्त इमारतीची आवश्यकता भासत होती. ती महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालक मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत आज ती पूर्णत्वास जात आहे. जाकादेवी पंचक्रोशी कुणबी समाज विकास मंडळ खालगाव जाकादेवी येथील कार्यकत्यांची सातत्याने मागणी होती की या जागेवर नवीन प्रशस्त इमारत उभारली जावी. या मागणीला ना. उदय सामंत यांनी आश्वासन देऊन व भरघोस असा निधी उपलब्ध करून एका वर्षाच्या आत देखणी व प्रशस्त इमारत उभारली गेली आहे. सुमारे ७.६०० फुटाची दुमजली प्रशस्त देखणी इमारत तयार झाली आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टेज, हॉल, तसेच वरच्या मजल्यावर एक प्रशस्त विविधपयोगी मोठा हॉल उभारण्यात आला आहे.

या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सकाळी १० वाजता गणेश पूजन व सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ३ वाजता महिलांचे हळदीकुंकू, संध्याकाळी ५ वाजता राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडणार आहे. रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, बहुरंगी नमन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 01/Jan/2026