गणपतीपुळे : गणपतीपुळे येथे आयोजित सरस महोत्सव २०२५ दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उभारलेल्या वैद्यकीय मदत कक्षास नागरिकांचा व पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभला. महोत्सवाच्या पाच दिवसांत १००हून अधिक रुग्णांची तपासणी व आवश्यक उपचार करण्यात आले.
या वैद्यकीय कक्षात ताप, सर्दी खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, रक्तदाब, साखर तपासणी, जखमांवर प्राथमिक उपचार, औषधोपचारांची सोय करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा दिल्यामुळे आरोग्य समस्या वेळेत हाताळता आल्या. महोत्सव काळात आरोग्य सुरक्षेची प्रभावी व्यवस्था केल्याबद्दल आयोजक व आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ही सेवा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माहेश्वरी सातव यांचे मार्गदर्शना खाली वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल पनकुटे, डॉ सुनीता पवार यांच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 01/Jan/2026














