रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी आगारात सुरक्षितता अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाचे उद्घाटन १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रा. प. प्रशिक्षण केंद्र येथे होणार आहे.
रा.प. कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सुरक्षितता अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 01/Jan/2026














