दापोली : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित रत्नागिरी सरस २०२५ या जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री स्पर्धेत दापोली तालुक्यातील देगाव येथील विद्या अशोक कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
ग्रामीण महिलांच्या स्वयंसहायता समूहांनी तयार केलेल्या दर्जेदार, नावीन्यपूर्ण व बाजारपेठेसाठी उपयुक्त उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शन व विक्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भक्ती स्वयंसहायता समूह, देगाव यांच्या माध्यमातून विद्या कदम यांनी सादर केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, सादरीकरण तसेच बाजारातील मागणीचा विचार करून परीक्षकांनी त्यांची प्रथम क्रमांकासाठी निवड केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 01/Jan/2026














